तुम्हाला कधी वेड लागला आहे ? कदाचित तुम्हाला वाटत असेल कि हा प्रश्न विचारताना मलाच वेड लागला आहे ….. नाही पण , सांगा ना, तुम्हाला कधी वेड लागला आहे ? जरा तुमची मदत करतो , उत्तर द्यायला . हे वेड अमावस्या किंवा पोर्णिमे ला लागणारं वेड नाही . हे वेड आहे सचिन (अर्थातच तेंडूलकर ) सारखं. आता तुम्ही मला नक्कीच माराल, सचिन ला वेडं म्हटल्या बद्दल . पण खरच तो वेडा आहे आणि मला त्याच्या क्रिकेट कौशाल्या पेक्षा त्याचं वेडंच आवडतं. त्याच्या वेडाची अनेक उदाहरणं देता येतील पण आठवा तो 1999 चा world cup . दौऱ्या वर असताना त्याचे वडील वारले . तो भारतात आला आणि ४च दिवसात तो परतला देशासाठी खेळण्या साठी …..२४ -२६ तासाचा जेट lag आणि पहाटे पोहोचून सुद्धा लगेच ८ -९ वाजता मैदानात उतरून १४० धावा फटकावल्या पट्ठ्याने . वडिलांचा मृत्यू , २४ -२६ तासांचा जेट lag आणि वन डे मध्ये १४० रन बनवणे , या तिन्ही गोष्टी स्वतंत्र पणे दमवणाऱ्या आहेत …..आणि एकत्रित करणं फक्त वेडा माणूसच करू शकतो ….(ऐकायला , वाचायला सहज वाटता पण स्वतःला त्या ठिकाणी ठेवून पाहिलं कि कळत) म्हणून मी म्हटला तो वेडा आहे .
आणि असे वेडे हि काही कमी नाहीत , समोर १० जण भांडायला आले कि कोणीही पळून जाईल. पण ५०००० च्या फौजेवर फक्त ७ जणांनी तुटून पडायला वेडेच लागतात , फक्त ३०० सैनिक घेऊन कितीतरी पटीने जास्त असलेल्या सैन्या ला , ते पण धो धो पावसात दर्या खोर्यात पळत असताना , तासन तास झुन्जावायला , वेडेच लागतात .
आम्हला तर तेवढा नुसता ट्रेकिंग करताना घाम फुटतो , आणि लढणं तर सोडा साधी तहान आणि भूक पण सहन होत नाही.
.
हा सगळा वेडेपणा आठवण्याचं कारण म्हणजे अजून एका वेड्या बद्दल वाचनात आलं. मार्क इंग्लिस . त्याने माउंट. एवेरेस्ट सर केला ............ बरेच करतात , त्यात काय ……त्यात एवढाच कि तो double amputee (कमरेपासून दोन्ही पाय नसलेला ) आहे …. २२ वर्षापूर्वी माउंट . कुक वर गिर्यारोहण करताना हिम दंशा मुळे त्या चे दोन्ही पाय कापावे लागले होते . दोन्ही कृत्रिम पाय लाऊन तो माउंट एवेरेस्ट चढला.
वेड लागल्या शिवाय कोणी असा वेडे पणा करू शकत नाही.
पण असं वेड विचार करून घेता येत नाही, ते वेड लागावाच लागतं. चढाव लागतं , अंगात भिनाव लागतं. असं पूर्ण वेड लागल्या वरच मग अश्या अशक्य प्राय गोष्टी घडतात.
.………मग तुम्हाला वेड लागलं आहे का ?
पण असं वेड विचार करून घेता येत नाही, ते वेड लागावाच लागतं. चढाव लागतं , अंगात भिनाव लागतं. असं पूर्ण वेड लागल्या वरच मग अश्या अशक्य प्राय गोष्टी घडतात.
.………मग तुम्हाला वेड लागलं आहे का ?